“आमचे चांगले दिवस आम्हाला परत द्या” -किशोर तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी याना विनंती
“आमचे चांगले दिवस आम्हाला परत द्या” -किशोर तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी याना विनंती ‘अच्छे दिन’चे बारा वर्षे : महागाईने घर उद्ध्वस्त, कर्जाने शेतकरी हतबल, बेरोजगारीने तरुण अस्वस्थ - सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी : किशोर तिवारी “शेतकऱ्याला भाव नाही, ग्राहकाला स्वस्ताई नाही, तरुणाला रोजगार नाही, गरीबाला परवडणारे शिक्षण-उपचार नाहीत — मग विकास नेमका कुणाचा?” “२०१४ मध्ये महागाईविरुद्ध मते मागितली; २०२६ मध्ये त्याच महागाईचा हिशेब देण्याची वेळ आली — ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सामान्य माणसाचे बजेट उद्ध्वस्त केले” यवतमाळ, दि. २२ ऑगस्ट २०२६ : “बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार” आणि “अच्छे दिन आने वाले हैं” या घोषणांच्या आधारावर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कारभाराचा हिशेब आता देशातील सामान्य जनतेने मागितला पाहिजे. कारण आज गृहिणी महागाईने त्रस्त आहे, शेतकरी कर्ज आणि उत्पादन खर्चाच्या चक्रव्यूहात अडकला आहे, तरुण रोजगारासाठी भटकत आहे आणि गरीब कुटुंब शिक्षण व उपचारांच्या वाढत्या खर्चापुढे हतबल झाले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी नेते किशोर तिवारी य...