नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग यांनी मला घरगुती वापराचे दिलेले ६१,४९० रुपये बिल






किशोर तिवारी   

       मा. अध्यक्ष 

कै .वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन ,

राज्यमंत्री दर्जा ,महाराष्ट्र राज्य 

मा. राष्ट्रीय प्रवक्ते ,

शिवसेना ,      

  ( १०,त्रिशरण ,    सोमलवार शाळेसमोर खामला ,   नागपूर-४४००२५    सम्पर्क-९४२२१०८८४६  )

=========================================================

दिनांक -३० जून २०२५

संदर्भ - नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग यांनी मला घरगुती वापराचे दिलेले ६१,४९० रुपये बिल 

             करार क्रमांक -५६१३२२९४  मीटर क्रमांक - २०२२A ३०४३५९४ देयक क्रमांक -००००१०५३१५३

विषय - नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग मार्फत होत असलेला अन्याय व छळ संपविण्याबाबत 

महोदय ,

मी एक अत्यंत गरीब व ४० वर्ष सक्रीय राजकारणात व १० वर्ष राज्यमंत्री दर्जा असलेल्या सरकारी पदावर असूनही माझ्या घरच्या लोकांनी हजारो नाहीतर एकही पैसा कंत्राटदाराकडून वा टोल वाल्याकडून जमा करून श्रीमंत झालेलो नाही मात्र माझ्यासोबत राजकारणात आलेले सर्व नेते व त्यांचे कुटुंबीय हजारों कोटीचे मालक रात्रदिवस समाजसेवा करून झाले आहेत  मात्र मी  दोन वेळचे जेवण सुद्धा कसे बसे खात आहे ,मात्र नागपूरचा   नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग एका लबाड दलाला कडे दिल्यानंतर त्या मस्तवाल हरामी कंपनीने माझा २००८ पासुन जो अन्याय व छळ सुरु केला आहे तो संपविण्याबाबत त्याबाबत ही याचीका सादर करीत आहे व मला न्याय मिळेल अशी आशा करतो . 

१. मी नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग यांचा सन १९९३ पासून ग्राहक आहे माझा मीटर पाण्याच्या टाकी जवळ होता म्हणून नवीन मीटर बाहेर गेट जवळ ७-३-२००८ मध्ये जबरीने बसवला माझ्याकडून त्यासाठी सुमारे ८ हजार रुपये एका खाजगी  कंपनीने उकळले . 

२. मला त्रैमासिक पाण्याचे बिल १९९३ पासुन मार्च २००८ पर्यंत सरासरी ४०० रुपये ते ६०० रुपये येत होते मात्र  जुन २००८ मध्ये मला २००० च्या वर बिल आले मी हा अन्याय व छळ तात्कालीन आयुक्त यांच्याकडे मांडला त्यांनी मला जलप्रयाद विभागाचे खाजगीकरण झाले असुन आपण लक्ष्मीनगर येथील कार्यालयात जाण्यास सांगीतले मी त्या ठिकाणी दहा वेळा टोले खाल्यानंतर मला नवीन मीटर लावा आम्ही त्याची ट्रायल घेऊ त्यासाठी मला नव्याने १२ हजार खर्च करण्यास सांगीतले व मी नवीन मीटर लावले व ट्रायल झाली व आपले पुढील बिल सुधारून येईल असे सांगण्यात आले मात्र पुढील बिल सुद्धा त्यापेक्षा जास्त आले त्यावेळी मी रीतसर तक्रार लक्ष्मीनगर कार्यालयात केली यावेळी त्यांनी फक्त आठ वेळा येरझारा मारल्यावर आपण आपला पाण्याचा वरचं व खालचा टाका नवीन करा असा आदेश दिला त्यानंतर मी खालचा टाका नवीन केला व वरचा टाका प्लस्टिक चा बसवला यासाठी मला ३२ हजार रुपये खर्च आला मी तसा अहवाल लक्ष्मीनगर कार्यालयातील मस्तवाल अधिकाऱ्याला दिला त्यांनी आपली टीम पाठवुन पाहणी केली मात्र पुढील बिल त्यापेक्षा जास्त आले . 

३. आता ४० हजार खर्च केल्यानंतरही न्याय मिळत नसल्यामुळे मी तात्कालीन आयुक्त  नागपूर महानगर पालिका यांच्याशी संपर्क केला मात्र आपण या खाजगी कंपनीच्या विरोधात आपण भ्रष्टाचाराची तक्रार केल्यामुळे आपला छळ सुरु असल्याचे सांगीतले मात्र या राजकीय नेत्याची या वॉटर कंपनीत भागीदारी असल्यामुळे तुमची तक्रार मागे घ्या व लक्ष्मीनगर येथील कार्यालयात बसणारा हा डॉन असुन त्यालाच विनंती करण्यास सांगीतले . आयुक्तांची लाचारी बघुन लक्ष्मी नगर येथील डॉन शी भेट घेतली त्यांनी मला आम्हची सर्व व्यवस्था व मीटर ठीक असून तुम्ही सकाळी व संध्याकाळी ज्यावेळी नळ येतो त्यावेळी  मीटर जवळ असलेला  वाल सुरु बंद करण्यासाठी चौकीदार लावा असा आदेश दिला व २०१० पासुन मी आजपर्यंत याकामासाठी कर्मचारी ठेवला आहे व दरमहा १० हजार रुपये महिना देत आहे . 

४. मात्र माझे त्रैमासिक बिल वापरानुरूप येत नसुन त्यावर तोडगा काढण्यासाठी मार्च २०२५ मध्ये लक्ष्मीनगर येथी या खाजगी मालकास भेटण्याचा सल्ला दिला व मालकास फोन केला त्यांनी मी पाण्याचे बिल पाहत नाही असा निरोप दिला आता मला  पुन्हा ६१,४९० रुपयाचे बिल आले आहे व माझा वरील अन्याय व छळ सुरूच आहे 

कायदेशीर  विनंती 

माझ्या पाणी वापराची लवादा मार्फत चौकशी करावी व माझ्या पाणी वापरांची  खरे बिल काढावे व मला त्यानुरूप द्यावे व त्यानंतर मी संपुर्ण बिल भरण्यास तयार आहे मात्र ह्या खाजगी कंपनीने भ्रष्टाचार करून जो गोरख गोरखधंदा सुरु केला आहे तो तात्काळ बंद करावा व माझ्यासारख्या हजारो ग्राहकांना न्याय दयावा 

आपला नम्र 

किशोर तिवारी 

















Comments

Popular posts from this blog

22 Farmers Suicide in Yavatmal in January- Central Government's failed to address Agrarin Crisis - Kishore Tiwari

Import Duty cut on Cotton will fuel agrarian crisis in Maharashtra-Kishore Tiwari